PNB Savings Scheme : भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच रेपो दरात ०.५० बेसिस पॉईंटची कपातीची घोषणा केली. त्यामुळे कर्ज स्वस्त होणार असले तरी तुमच्या बचत योजनांवरील व्याजही कमी होणार आहे. पण, देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने अद्याप एफडीचे व्याजदर घटवलेले नाहीत. मात्र, बँक लवकरच या दरांमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, आज आम्ही तुम्हाला पीएनबीच्या एका खास एफडी योजनेबद्दल माहिती देत आहोत, ज्यात केवळ १ लाख रुपये जमा करून तुम्ही २३,८७२ रुपयांपर्यंत निश्चित व्याज मिळवू शकता.
पीएनबीच्या बचत ठेव दरांची स्थिती
पंजाब नॅशनल बँकेत ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी खाते उघडता येते. बँक सध्या एफडी खात्यांवर ३.००% ते ७.३०% पर्यंत व्याज देत आहे.
| कालावधी | सामान्य नागरिक (व्याजदर) | ज्येष्ठ नागरिक (व्याजदर) | अति ज्येष्ठ नागरिक (व्याजदर) |
| ३९० दिवस | ६.५०% (सर्वाधिक) | ७.००% | ७.३०% |
| ३ वर्षे | ६.४०% | ६.९०% | ७.००% |
टीप : पीएनबीमध्ये ३९० दिवसांच्या एफडीवर अति ज्येष्ठ नागरिकांना ७.३०% इतका सर्वाधिक व्याजदर मिळत आहे.
१ लाख जमा केल्यास किती मिळेल परतावा?
जर तुम्ही पीएनबीच्या ३ वर्षांच्या एफडी योजनेत १,००,००० रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम खालीलप्रमाणे असेल.
| नागरिक श्रेणी | लागू व्याजदर | मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम (रुपये) | निश्चित व्याज, रुपये (फायदा) |
| सामान्य नागरिक | ६.४०% | १,२०,९८३ | २०,९८३ |
| ज्येष्ठ नागरिक | ६.९०% | १,२२,७८१ | २२,७८१ |
| अति ज्येष्ठ नागरिक | ७.००% | १,२३,८७२ | २३,८७२ |
वाचा - इंडिगोच्या गोंधळानंतर सरकारचा कठोर निर्णय; विमान भाड्याची कमाल मर्यादा निश्चित, रिफंडसाठी अल्टीमेट
आरबीआयने रेपो रेट कमी केल्यामुळे, पीएनबी लवकरच एफडीचे व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे, उच्च दराचा फायदा घेण्यासाठी ही एफडी योजना आताच बुक करणे फायदेशीर ठरू शकते.
